वीज दर वाढ रोखून धरलेली असते ...पण कधीना कधी दर वाढीची वीज कोसळतेच ....
पेट्रोल दरवाढीमागे एक छोटीशी कपात लपलेली असते... कधीना कधी सरकार करतेच...
उसाला दरवाढ मंत्र्यांना द्यायची नसते .....पण कधीना कधी इलेक्शन लागल्यावर ती मिळतेच...
कासव छाप घुसमटवित असते ..... पण कधीना कधी मच्छरांची इंगळी डसतेच ...
डेलीसोपची मालिका संपत नसते......पण कधीना कधी रीळ संपत असतेच...
सजीवाचे जीवन हे मर्त्य असते....... पण कधीना कधी ती ज्योत विझणारअसतेच ....
रोज एका वादाची भर होत असते..... पण कधीना कधी वादावादी होणार असतेच.......
एकच प्यालामुळे लिव्हर खराब होत असते ...पण कधीनां कधी ते बाद होणारच असतेच .....
रिमोट कंट्रोलची ब्याटरी एक दिवस संपते .....पण कधीना कधी ती रिचार्ज होणार असतेच.....
आकाश हे काळ्या ढगांनी भरलेले असते ......पण कधीनां कधी तेही निरभ्र होतेच..........
.
या "कधी"ची वाट बघण्यात जिंदगी बेकार जात असते.....पण कधीना कधी तीही बेकार होतेच...
.
कारण सत्य हे पाण्यात बुडालेल्या "मयता "सारखे असते ...पण कधीना कधी फुगून वर येतेच ....
.
.
.
..................................... विक्रांत बसंत फडके

No comments:
Post a Comment