Wednesday, 29 May 2013

प्रेम आणि बेवफाई

तू काय केलेस याची खातरजमा न करता मी तुला स्विकारले !
खोटे प्रेम करून खरी बेवफाई केलीस याचा कैफ नसे मला || १ ||
.
तू काय असशी यापेक्षा मी तुला आवडतो म्हणुनी मी न धिक्कारले !
खरे प्रेम करून खोटी बेवफाई केलीस याचा कैफ नसे मला || २ ||
.
तू वाईट आहेस यापेक्षा तू काही पुण्य केल्याचे मम हृदयी भावले !
खोटे प्रेम करून खोटी बेवफाई केलीस याचा कैफ नसे मला || ३ ||
.
तू खरा आहेस यापेक्षा सत्य तुझ्या हृदयातले मज दिसले !
खरे प्रेम करून खरी बेवफाई केलीस याचा कैफ आहे मला || ४ ||
.
.
जाऊ दे ! विसरून जा !! माझ्या छातीतून झिरपणारे प्रेम न तुला दिसले !
कसेतरी प्रेम करून बेवफाई केलीस याचा कैफ असे मला || ५ ||
.
.
.
.
.
.......................................... विक्रांत वसंत फडके

Monday, 27 May 2013

केवळ तिच्यामुळे ! केवळ तिच्यामुळे !!

मी तिच्याशी प्रेमाचे नाटक केले होते पण केवळ द्वेषाने ...
पण नंतर तिच्या प्रेमात मी पडलो होतो .....
नंतर द्वेषाची जागा प्रेमाने घेतली अन
माझ्यातील द्वेषांकुर उठला ...
तरी मी प्रेम केले होते द्वेषाने !!! केवळ द्वेषाने !!!
.
मी म्हणालो ! चल येतेस का? केवळ द्वेषाने ...
पण नंतर तिच्या प्रेमात मी पडलो होतो ......
नंतर द्वेषाची जागा हक्काने घेतली अन
माझ्यातील मनुष्यांकुर उठला ...
तरी मी प्रेम केले होते मनुष्यत्वाने !! केवळ मनुष्यत्वाने !!!
.
मी म्हणालो ! मी निघालो ! तू पण बाहेर पड...
पण नंतर ती घाबरली ! तरी मी स्थितप्रज्ञ होतो ...
नंतर ती स्थिर राहिली आणि हक्क गेला चुलीत अन
माझ्यातील असुरांकुर जागा झाला ..
तरीही मी प्रेम केले होते असुरत्वाने ! केवळ असुरत्वाने !!!
.
मी स्थित राहिलो ! मी भरकटलो !! मी गुरफटलो !!!
पण नंतर ती अडकली ! तरी मी पुरुष होतो ...
नंतर ती माता बनली आणि मी काखा मिरवल्या अन
माझ्यातील पुरुष जागा झाला ..
मी जागा झालो पुरुषत्वाने ! केवळ पुरुषत्वाने !!!
.
कोर्ट कचेर्या तिने केल्या ! मी अहम जपीत राहिलो ! जपाने !!!
पण नंतर माळ गुरफटली ! तरी मी माळमणी नव्हतो .....
नंतर मधला मणी निखळला आणि माळा विझल्या अन
माझ्यातील अहंकार जागृत झाला
मी हरलो केवळ अहंकाराने ! केवळ अहंकाराने !!!
.
.
.
ती तिथेच होती पण मी तिला कचरा समजलो अन कचरा कुणी दुसर्यानेच उचलला !
मी अजूनही अहमात ! मी अजुनही अहंकारात ! मी अजूनही पुरुषत्वात !
परी अहम माझ्यापासूनी न दूर होत पाहे केवळ तिच्यामुळे ! केवळ तिच्यामुळे !!
.
.
.
.
................................................ विक्रांत वसंत फडके

Friday, 17 May 2013

टोळ पहा कसे गवतावरती आनंदे टुणटुण उडती .....................


आम्ही नाही खाल्ले काही असे नेते म्हणती
टोळ पहा कसे गवतावरती आनंदे टुणटुण उडती || १ ||
.
समाजकारण करून करून झिजलो म्हणती
टोळ पहा कसे गवतावरती आनंदे टुणटुण उडती || २ ||
.
राजकारणात राम नाही म्हणून इलेक्शनला उभे राहती
टोळ पहा कसे गवतावरती आनंदे टुणटुण उडती || ३ ||
.
घोटाळे करून वर तोंड करून न केल्याचे सांगती
टोळ पहा कसे गवतावरती आनंदे टुणटुण उडती || ४ ||
.
वर तोंड करून फिदीफिदी हसती सभेत मात्र भांडती
टोळ पहा कसे गवतावरती आनंदे टुणटुण उडती || ५ ||
.
कुणी ना कमी कुणी ना जास्त सर्वांचीच गुप्त युती
टोळ पहा कसे गवतावरती आनंदे टुणटुण उडती || ६ ||
.
म्हणती द्या पद नाहीतर वाढवेन दुसर्याची संख्या शक्ती
टोळ पहा कसे गवतावरती आनंदे टुणटुण उडती || ७ ||
.
पाणी नाही म्हणणार्या जनतेच्या तोंडात मुतती
टोळ पहा कसे गवतावरती आनंदे टुणटुण उडती || ८ ||
.
बाके वाजवती, शिव्या देती, काही झोपाही काढती
टोळ पहा कसे गवतावरती आनंदे टुणटुण उडती || ९ ||
.
जनता मेली किवा जगली हे नाही त्यांच्या खिजगणती
टोळ पहा कसे गवतावरती आनंदे टुणटुण उडती || १० ||
.
नेते टुणटुण उडती कसे पहा संसदेतील बाकावरती
टोळ मात्र गवताच्या पात्याच्या धारेने हैराण होती || ११ ||


.
.
.
.
.
.........................विक्रांत वसंत फडके

Monday, 6 May 2013

अखंड भारताचे "कांडण "वन .....


मन्या विचारे सोनियाला
देऊ या चीनला भूमी आंदण....
हिंदू भांडे मुस्लिमांसंगे
करीन म्हणतात एकमेकांचे कांडण // १ //
.
शरद म्हणे अजितला
तुझ्या चड्डीला मुताचे गोंदण
मुस्लिम भांडे बहुजनासंगे
करीन म्हणतात एकमेकांचे कांडण // २ //
.
लालू म्हणे राबडीला
करू मिळूनी चाऱ्याचे खंडन
बहुजन भांडे ख्रिश्चना संगे
करीन म्हणतात एकमेकांचे कांडण // ३ //
.
पेट्रोल,डीझेल म्हणती जनतेला
नका करू रुदन
ख्रिश्चन भांडे शीखा संगे
करीन म्हणतात एकमेकांचे कांडण // ४ //
.
टू जी, कोळसा आणि आदर्श
करती हात दाखवून अवलक्षण
शीख भांडे इसाया संगे ,
करीन म्हणतात एकमेकांचे कांडण // 5 //
.
सोनिया सांगे मंत्र्यांना
करू नका आपसात भांडण
सर्वांनी मिळून करू
अखंड भारताचे "कांडण "वन ..... // ६ //
.
.
.
................................... विक्रांत वसंत फडके

Thursday, 2 May 2013

गांधी हत्येचे कारण....................... Copy Paste from one source



गांधी हत्येचे कारण-

 खून खटल्याच्यावेळी न्यायमूर्ती खोसला यांनी नथुराम
गोडसे यांना त्यांचे निवेदन स्वतःच वाचावे
यासाठी परवानगी दिली होती. मात्र नथुराम
गोडसेंचे ते निवेदन भारत सरकारने प्रतिबंध
घालून प्रसिद्ध करण्यास मनाई केली होती.
या प्रतिबंधाच्या विरोधात नथुरामांचे भाऊ
आणि गांधी हत्येचे सहअपराधी गोपाळ गोडसे
यांनी ६० वर्षे न्यायालयीन लढाई केली.
परिणामस्वरूप सर्वोच्च न्यायालयाने
हा प्रतिबंध
काढायला लावला आणि निवेदनाच्या प्रकाशनाला
न्यायालयात नथुराम गोडसे
यांनी गांधीहत्येची जी १५० कारणे
सांगितली होती. त्यांतली प्रमुख अशी --

1. अमृतसरच्या सन
१९१९च्या जालियनवाला बाग हत्याकांडात
झालेल्या नरसंहाराबद्दल जनरल डायर
यांना जबाबदार धरून त्यांच्यावर
खटला चालवण्यात यावा अशी मागणी संतप्त
जनतेकडून झाली होती. मोहनदास
गांधी यांनी या मागणीला समर्थन देण्यास नकार
दिला .

2. भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव
यांना दिलेल्या फाशी मुळे
संतापलेली जनता गांधींकडे आशेनी बघत होती,
की गांधीने यात हस्तक्षेप करून या तरुण
देशभक्तांचे प्राण वाचवावे. पण
गांधीनी भगतसिंहाच्या कृतीला अनुचित हिंसक
कार्यवाही म्हणून हस्तक्षेपास नकार दिला .

3. ६ मे १९४६ ला समाजवादी कार्यकर्र्त्यां­
च्या संमेलनात संबोधित करताना गांधीने मुस्लीम
लीगच्या हिंसेसमोर जनतेला आहुती देण्याचे
आवाहन केले होते.

4. महंमद अली जिना आणि इतर
राष्ट्रवादी मुस्लीम यांच्या विरोधाला न
जुमानता १९२१ मध्ये गांधीनी खिलाफत
आंदोलनाला आपले समर्थन जाहीर केले. तरी पण
केरळमध्ये मुसलमानांनी तिथल्या हिंदूंना मारहाण
केली, आणि जवळ जवळ १५०० हिंदू ठार मारले
गेले आणि २००० हिंदूना बाटवून मुसलमान केले.
गांधीनी याचा निषेध न करता याचे वर्णन
खुदा के बहादूर बंदो कि बहादुरी असे केले.

5. गांधींनी अनेक
वेळा राजा छत्रपती शिवाजी महाराज,
महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग यांना पथभ्रष्ट
राष्ट्रभक्त म्हटले होते.

6. गांधीनी काश्मीरचे राजा हरिसिंग
यांना काश्मीर मुस्लिम बहुल आहे म्हणून शासन
सोडून काशीला जाऊन प्रायश्चित करण्यास
सांगितले, आणि या उलट
हैदराबादच्या निझामालाला हैदराबाद हिंदू बहुल
असूनही समर्थन दिले होते.

7. जिना यांना कायदे आझम ही उपाधी गांधींनीच
दिली होती

8. काँग्रेसच्या ध्वज निर्धारण समितीने १९३१
मध्ये चरखा अंकित
असलेल्या भगवा रंगाच्या ध्वजाचा निर्णय
घेतला होता, पण गांधींच्या हट्टामुळे ध्वज
तिरंगी केला गेला

9. काँग्रेसच्या त्रिपुरा अधिवेशनात
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना बहुमताने अध्यक्ष
निर्वाचित केले गेले होते. पण गांधींचे समर्थन
पट्टाभि सीतारामय्या यांना असल्यामुळे
आणि सुभाष
बाबूंनी त्यांना नेहमीनेहमी होणाऱ्या विरोधामुळे
आणि गांधींच्या असहयोगामुळे राजीनामा दिला.

10. लाहोर काँग्रेसमध्ये पण सरदार वल्लभभाई
पटेल हे बहुमताने निवडून आले असूनही केवळ
गांधींच्या हट्टामुळे हे पद जवाहरलाल नेहरू
यांना दिले गेले.
१४-१५ जून १९४७ ला दिल्लीमध्ये
झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये
भारताच्या फाळणीचा निर्णय अस्वीकृत होणार
होता, पण गांधींनी तिकडे जाऊन ऐन वेळेस
विभाजनाला आपले समर्थन जाहीर केले.
या आधी त्यांनीच म्हंटले होते की विभाजन हे
माझ्या प्रेतावरच होईल .

11. जवाहरलाल
नेहरूंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने सोमनाथ
मंदिर पुनर्निर्माण सरकारी खर्चाने होणार
हा प्रस्ताव पारित केला होता. पण गांधी हे
मंत्रिमंडळाचे सदस्य नसतानादेखील
त्यांनी हा प्रस्ताव फेटाळण्यास भाग पाडले,
आणि त्याच वेळेस दिल्लीमधील
मशिदीची दुरुस्ती सरकारी खर्चाने
व्हावी यासाठी १३ जानेवारी १९४८ ला उपोषण
करून सरकारवर दबाव आणला.

12. पाकिस्तानातून आलेले हिंदू
निर्वासितांनी जेव्हा मशिदीत
तात्पुरता आसरा घेतला तेव्हा गांधीने लहान पोरे,
महिला, वृद्ध अशा सर्वांना बाहेर काढून भर
थंडीत रस्त्यावर राहण्यास भाग पाडले.

13. ऑक्टोबर १९४७ ला जेव्हा पाकिस्तानने
काश्मीरवर अचानक
हल्ला केला तेव्हा पाकिस्तानला ५५ कोटी रुपये न
देण्याचा मंत्रिमंडळाच्या
प्रस्तावाला आपला विरोध आहे हे
दाखवण्यासाठी गांधींनी परत उपोषण करून
ही राशी भारताच्या हिताविरुद्ध
पाकिस्तानला देण्यास सरकारला बाध्य केले.

मृत्युदंड-
नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटे
यांना १५ नोव्हेंबर १९४९ ला पंजाबमधील
अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आले. त्यांचे
अंतिम शब्द असे होते, " जर
आपल्या मातृभूमीसाठी भक्तिभाव ठेवणे पाप
असेल तर मी ते पाप केले आहे, आणि जर मी हे
पुण्य केले असेल तर या पुण्यावर मी माझा नम्र
अधिकार आहे असे जाहीर करतो.!!