Monday, 6 May 2013

अखंड भारताचे "कांडण "वन .....


मन्या विचारे सोनियाला
देऊ या चीनला भूमी आंदण....
हिंदू भांडे मुस्लिमांसंगे
करीन म्हणतात एकमेकांचे कांडण // १ //
.
शरद म्हणे अजितला
तुझ्या चड्डीला मुताचे गोंदण
मुस्लिम भांडे बहुजनासंगे
करीन म्हणतात एकमेकांचे कांडण // २ //
.
लालू म्हणे राबडीला
करू मिळूनी चाऱ्याचे खंडन
बहुजन भांडे ख्रिश्चना संगे
करीन म्हणतात एकमेकांचे कांडण // ३ //
.
पेट्रोल,डीझेल म्हणती जनतेला
नका करू रुदन
ख्रिश्चन भांडे शीखा संगे
करीन म्हणतात एकमेकांचे कांडण // ४ //
.
टू जी, कोळसा आणि आदर्श
करती हात दाखवून अवलक्षण
शीख भांडे इसाया संगे ,
करीन म्हणतात एकमेकांचे कांडण // 5 //
.
सोनिया सांगे मंत्र्यांना
करू नका आपसात भांडण
सर्वांनी मिळून करू
अखंड भारताचे "कांडण "वन ..... // ६ //
.
.
.
................................... विक्रांत वसंत फडके

No comments:

Post a Comment