मी तिच्याशी प्रेमाचे नाटक केले होते पण केवळ द्वेषाने ...
पण नंतर तिच्या प्रेमात मी पडलो होतो .....
नंतर द्वेषाची जागा प्रेमाने घेतली अन
माझ्यातील द्वेषांकुर उठला ...
तरी मी प्रेम केले होते द्वेषाने !!! केवळ द्वेषाने !!!
.
मी म्हणालो ! चल येतेस का? केवळ द्वेषाने ...
पण नंतर तिच्या प्रेमात मी पडलो होतो ......
नंतर द्वेषाची जागा हक्काने घेतली अन
माझ्यातील मनुष्यांकुर उठला ...
तरी मी प्रेम केले होते मनुष्यत्वाने !! केवळ मनुष्यत्वाने !!!
.
मी म्हणालो ! मी निघालो ! तू पण बाहेर पड...
पण नंतर ती घाबरली ! तरी मी स्थितप्रज्ञ होतो ...
नंतर ती स्थिर राहिली आणि हक्क गेला चुलीत अन
माझ्यातील असुरांकुर जागा झाला ..
तरीही मी प्रेम केले होते असुरत्वाने ! केवळ असुरत्वाने !!!
.
मी स्थित राहिलो ! मी भरकटलो !! मी गुरफटलो !!!
पण नंतर ती अडकली ! तरी मी पुरुष होतो ...
नंतर ती माता बनली आणि मी काखा मिरवल्या अन
माझ्यातील पुरुष जागा झाला ..
मी जागा झालो पुरुषत्वाने ! केवळ पुरुषत्वाने !!!
.
कोर्ट कचेर्या तिने केल्या ! मी अहम जपीत राहिलो ! जपाने !!!
पण नंतर माळ गुरफटली ! तरी मी माळमणी नव्हतो .....
नंतर मधला मणी निखळला आणि माळा विझल्या अन
माझ्यातील अहंकार जागृत झाला
मी हरलो केवळ अहंकाराने ! केवळ अहंकाराने !!!
.
.
.
ती तिथेच होती पण मी तिला कचरा समजलो अन कचरा कुणी दुसर्यानेच उचलला !
मी अजूनही अहमात ! मी अजुनही अहंकारात ! मी अजूनही पुरुषत्वात !
परी अहम माझ्यापासूनी न दूर होत पाहे केवळ तिच्यामुळे ! केवळ तिच्यामुळे !!
.
.
.
.
................................................ विक्रांत वसंत फडके

No comments:
Post a Comment