Thursday, 22 May 2014

ब्रेड आणि बटर....................













राहुल किटलीवाला , छोटा पतौडी आणि डिग्गी शिंग या नावाचे तीन वयस्कर मित्र असतात .......
.
तिघेही उतार वयातच लग्न ( कितवे हा इश्यू इथे महत्वाचा नाही ) करतात ...
तिघेही कर्मधर्मसंयोगाने एकाच हॉटेलात हनिमून साठी जातात ....
तिघे सरत्या दिवशी काय काय केले हे एकमेकांना सांगायचे असे ठरवतात .....
नाही सांगितले तर दोस्ती तुटेल वैगेरे वैगेरे शपथा खातात ...
.
रात्र सरते ....
.
सकाळ उजाडते ....
.
 तिघेही त्यांच्या नववधुंसह ब्रेकफास्ट साठी टेबलावर येतात ...
.
शपथ तर पुरी करायचीच आहे पण एकमेकांच्या बायकांसमोर शब्दाने सांगणे म्हणजे शरमेचे असे तिघांनाही वाटते ...
.
तितक्यात वेटर ब्रेड आणि बटर घेऊन येतो ...
राहुलला आयडीया सुचते !!!
तो ब्रेड हातात घेऊन एका बाजूला 'एक' चमचा बटर लावतो आणि ब्रेडडिश मध्ये ठेवतो ...
.


छोटा पतौडीला हा इशारा समजतो ...तो  ब्रेड हातात घेऊन एका बाजूला 'दोन' चमचे बटर लावतो ...
.
डिग्गी शिंगला पण इशारा समजल्याचा इशारा करून तो ब्रेड हातात घेतो ...
ब्रेडच्या एका बाजूला एकदा आणि दुसर्या बाजूला दोनदा बटर लावून ब्रेड खाउन टाकतो ....
.
राहुल आणि छोटा पतौडी बेशुद्ध पडलेले असतानाच झुठमत वाहिनीतर्फे एक दाढीवाले वटवाघूळ ह्या सर्व घडामोडींचे लाइव्ह प्रक्षेपण करत असलेला पाहून डिग्गी शिंगपण बेशुद्ध पडतो ....
.
इकडे काहीच न समजलेला झुठमतवाला वटवाघूळ लाइव्ह प्रक्षेपणात बोंबा मारत असतो " डिग्गी शिंग यांची मानसिकता दिसून येते, दुसर्यापेक्षा आपण किती महान आहोत हे सांगण्याची वृत्ती या कृतीतून दिसून येते, तिघांनाही पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.."
.
.
( वरील घटनांचा कुणीही  वाईट अर्थ शोधून काढल्यास किंवा कुणालाही काही अर्थ न लागल्यास लेखक म्हणून मी जबाबदार नाही ... पात्रांची नावे काल्पनिक आहेत .. जीवित अथवा मृत लोकांशी संबंध आढळल्यास तो एक योगायोग समजावा ...)

Sunday, 27 April 2014

सत्यमेव जयते ! सत्यम एव जयते !! सत्य म ऐवज यते !!! ....................

हरवलो मी सत्यात आणि असत्यातील द्वंद्वात ....
सत्य ते होते जे मला माहिती नव्हते ...
असत्य काय होते ते माझ्या नयनांसमोर दरवळत होते ....
मी हतबल होतो पण निराशावादी नव्हतो ....
आशावाद नजरेसमोरून तरळत होता ....
नजरबंदीची 'साठी' नष्ट होऊ पाहत होती ....
पण म्हणून मी ज्या सत्य असत्याच्या नाण्यात गुरफटत चाललो होतो ....
त्यातून बाहेर आलोच तर आणखी काही धुसर सत्ये समोर आ वासून बसणार होती .....
.
शेवटी सत्याशिवाय असत्याचा सामना करणे कुणालाही शक्य नव्हते .....
आणि असत्याशिवाय सत्याचे पिवळेपण उजळणार नव्हते ....
.
सत्यमेव जयते ! सत्यम एव जयते !! सत्य म ऐवज यते !!!
या वाक्यातील विखुरलेल्या अस्थी गोळा करणे म्हणजे दिव्य काम होते ...
तरीही सर्व भारतीयांच्या तोंडात मात्र सत्यमेव जयते स्फुटत होते ......
शेवटी सत्य नसले तरी आपले ब्रीदवाक्य आहे "सत्यमेव जयते ".....
.
.
.
.
........................ विक्रांत वसंत फडके