Sunday, 21 April 2013

सांग ना ग आई, काय असतो हा बलात्कार"?????? Copy & Paste





(या लेखातील सर्व नावे काल्पनिक आहेत)

"काय असतो हा बलात्कार"??

घरचा अभ्यास पूर्ण करूनच मी खाली खेळायला गेले
'सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय' हे गाण बोलून दाखवल्याने आई तू आज मला बक्षिसही दिलेस,

... मी आणि सायली दिवाळीसाठी किल्ले बनवत होतो,
आमचे कपडे,हात आणि छोटंस नाक ही मातीने भरलं होत,

तेवढ्यात मदन काका तेथे आले,हसतच म्हणाले काय बर....चाललंय?
मी म्हणाले काका,तुमच्या सायलीचे पण अंग चिखलानेच मळलय,

सायली तू थांब, तू चॉकलेट खाल्लस आता मी छकुलीला देतो,अस्स म्हणून मला घरी घेवून गेले,आणि मी घरात शिरल्यावर पटकन दारही बंदकेले ,

मी चॉकलेट खाण्यात गुंग असताना माझ्या छाती-पाठीवरून ते हात फिरवत होते ,मी म्हणाले काका चॉकलेट संपल आता मी घरी जाते....

पण तुला नवीन ड्रेस देतो म्हणून माझ्या अंगावरचे कपडेही काढले आणि अचानक माझे तोंड दाबून मला जमिनीवरही पाडले,

आई तू आणि बाबा गालावरच पापा घ्यायचे,पण काका संपूर्ण अंगावर घेत होते,त्यांच्या शरीराचा दाब माझ्या अंगावर पडल्याने माझे पोटही दुखतहोते,

काका,अहो काका.... सोडा ना मला म्हणून मी रडत होते,गप्प बस नाही तर मारेन म्हणून ते माझ्यावरच ओरडतहोते ,
अचानक झालेल्या वेदना सहनझाल्या नाहीत तेव्हा मला आई तुझीच आठवण येत होती,आता आई प्रतिकार करण्याची माझी ताकदही संपली होती,अचानक मदन काकांनी माझ्या नाका-तोंडावर उशी दाबली,
आई सर्दी घ्यायला कसा त्रास होतो,तसच वाटत होत ग,घरातल्या भिंतीही पंख्यासारख्या माझ्या डोळ्यांसमोर फिरत होत्या,शेवटी मी उशीच्या आतंच हंबरडा फोडला ,आणि तुझाच चेहरा डोळ्यांसमोर ठेवून शेवटचा श्वास सोडला.........


आई मदन काकांनी असं का केल ग ??

मी तर त्यांच्या सायलीचे फटाकेही नाही घेतले,तिच्या वाटेचे चॉकलेट ही नाही खाल्लं,मग का असे वागले ते माझ्याबरोबर?

आठवतंय तुला आई ,एकदा कढईतल्या गरम तेलाचा थेंबमाझ्या हातावर पडला होता तेव्हा तू ही माझ्याबरोबररडलीस,पण आज तर माझ संपूर्ण शरीरच जळाल पण तू माझी हाक नाही ऐकलीस,

आता आई दोन दिवस झाले तू आणि बाबा,संत्या मामा,रज्जु ताई,आजी सगळे-सगळे रडताय,मी तुम्हाला हाक मारतेय पण तुम्ही लक्ष्यचदेत नाहीये ,आई बर्थ-डेला तू माझ्या गळ्यात हार घालायचीस पण आज माझ्या फोटोला हार का घातला आहेस ग? आज तर माझा बर्थ-डे ही नाही ,सगळेजण तुला म्हणतात,"तुमची मुलगी देवाघरी गेली" पण आई.....देवाघरी जायला मदन काकां सारख्यांच्या वेदना सहन कराव्या लागतात का ग?

आई मीतुला कधी पासून ओरडून-ओरडून सांगतेय,पण तू काही ऐकतच नाहीस,फक्त रडत बसलीयेस,आता माझा घसा पण सुखलाय मला थोड पाणी देशील का ग ?? ग्लासात नको माझ्या waterbag मध्येच दे,

आई आता मी तुझ्या कडे येवू शकत नाही पण माझी सगळी खेळणी सायलीला दे आणि हो..... तिला सांग मदन काका म्हणजे तिच्या पप्पांकडून चॉकलेट नको घेवू हं.... नाहीतर ते तिला पण दुखवतील आणि उशीने तोंड दाबून देवाघरी पाठवतील,आई शेजारच्या काकू बघ ना, आप-आपसात बोलत असतात...... अगं..... तिच्या मुलीवर "बलात्कार" झालाय......,

"सांग ना ग आई, काय असतो हा बलात्कार"??????

"सांग ना ग आई, काय असतो हा बलात्कार"??????

Saturday, 13 April 2013

जाड भिंगाची फुटकी काच टक लावून बघायची का खर्या खुर्या रत्नाचे तेजात हरवून जायचे ?





कुठलेही "रत्न" मिळवणार्या माणसाने अजूनही कुठे मंदिर, मस्जिद किवा चर्च उभारल्याची नोंद कुणीही इतिहासात केलेली नाही आणि समजा कुणी म्हणत असेल कि अमुक एका समाजातील माणसाने इतिहास लिहिताना तशी घटना घडूनही ( कुठेतरी मंदिर, मस्जिद किवा चर्च उभारल्याची घटना ) त्याची नोंद केली नसेल तर त्या "रत्न"धारी "भारत"वासी महामानवाच्या कृतीची साक्ष तर अस्तित्वात असलीच पाहिजे का नाही ? अगदी साक्ष म्हणून बांधलेला इमला ( चर्च, मंदिर किवा मस्जिद किवा प्रार्थना स्थळ ) अस्तित्वात नसला तरी त्या इमल्याचे अवशेष तरी असतील का नाही ? …

.

भारत सरकारचा कुठलाही पुरस्कार न मिळवलेले इतकेच काय पाच वर्षे वकिलीचे शिक्षण घेऊनही केवळ इंग्रजांशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी लागतेय म्हणून सनद नाकारणाऱ्या स्वा. सावरकरांनी समस्त स्पृश्य आणि अस्पृश्य हिंदू बांधवांसाठी रत्नागिरीत पतित पावन मंदिर उभारले …… कुठल्याही नोंदीची गरज नसलेला पुरावा !!! पुराव्याची गरजच नाही कारण "अखंड" मंदिर अजूनही रत्नागिरीत डौलाने उभे आहे…
.
.
शेवटी रत्न आणि जाड भिंगाच्या चष्म्याची रस्त्याच्या बाजूला दारुड्या प्रमाणे लोळत पडलेली "फुटकी" काच यात फरक आहेच ना? रत्न रस्त्याच्या बाजूला "जाणूनबुजून" कुणी पाडवले तरी ते लोड शेडींगच्या वेळी "प्रकाश" टाकतेच … आणि जाड भिंगाच्या चष्म्याची रस्त्याच्या बाजूला दारुड्या प्रमाणे लोळत पडलेली "टाकाऊ"फुटकी काच कुणाच्या पायात गेली तर केवळ "रक्त" सांडते, कुठल्या गाडीच्या टायरमध्ये घुसली तर टायर पंक्चर करते …

.

निर्णय तुमच्या हाती आहे …. जाड भिंगाची फुटकी काच टक  लावून बघायची का खर्या खुर्या रत्नाचे तेजात हरवून जायचे ?

Friday, 12 April 2013

अहम मुक्त होतो परी तवं अडकतो ….

तरीही दरवर्षी १४ एप्रिलला अहम मुक्त होतो परी तवं अडकतो ….
नाकात जणू एक असा उग्र वास घोंगावतो कि जिणे नकोसे होते …
श्वास कोंडतो !! त्वेषाने डोळ्यांना पण जाड भिंगाचा चष्मा लागतो ?!?..॥ १ ॥
.
तरीही दरवर्षी १४ एप्रिलला अहम मुक्त होतो परी तवं अडकतो ….
कधी न वावगे कुणी तयांशी वागले परी तयांची कृती का दुखवते ……
ठसका लागतो !! ठसक्याने घशाला सम कर्क रोध दुखावतो ??!!??...॥ २ ॥
.
तरीही दरवर्षी १४ एप्रिलला अहम मुक्त होतो परी तवं अडकतो ….
केला देऊ तवांने तरी तव नियती का तुजसवे लपाछपी खेळते ?……
हस्तरेषा फिरते !! रेषेने कुणा वाचणार्याच्या जीव का वाचू लागतो ??!!?? ।। ३ ॥
.
तरीही दरवर्षी १४ एप्रिलला अहम मुक्त होतो परी तवं अडकतो ….
करविली "तवांतरे"! लादिली आरक्षित "बंदरे"!! नियती अर्थाशी खेळते ....
"घटना" फिरवली गेली अन प्रयोग करूनही खरां सत्यात भरकटतो … ॥ ४ ॥
.
तरीही दरवर्षी १४ एप्रिलला अहम मुक्त होतो परी तवं अडकतो ….
तळ्याची चाखिली जयाने माती, चिखलात कमळ कमाल करून जाते ....
अन कसपटी बेडूक डराव डराव करुनची कुर्मास "फुका" दरडावतो .....॥ ५ ॥
.
.
.
( थोडक्यात अर्थ :- वाचले म्हणून येणारा अहम मुक्त होतो पण अनुभवातून येणारा तवं वाचनात अडकतो ….नुसतेच वाचून काही अर्थ नाही वाचनातून काही "बोध" घेतला तरच त्या वाचनाला किंमत असेल )
.
.
.
..................... विक्रांत वसंत फडके

Thursday, 4 April 2013

फक्त १९२० नंतरचा हिंदुस्थान .........

कुणा ना समजले शंभू राजे, कलेजी लागला फक्त दुर्दैवी अंत !
कुणा ना उमगले भाऊ , जयाने फोडीले दिल्लीचे मखमली तख्त !!
परी यत्र तत्र सर्वत्र फक्त आणि फक्त १९२० नंतरचा हिंदुस्थान ...... ।। १ ।।
.
झाशीच्या लक्ष्मीने त्यागला प्राण, टोप्यांनी मान त्यागिली !
१८५७ सालचा प्रलय , ज्याच्यामुळे इंग्रजी जान थरथरली !!
पण तरीही यत्र तत्र सर्वत्र फक्त आणि फक्त १९२० नंतरचा हिंदुस्थान ...... ।। २ ।।
.
विरले ते भगवतसिंग , विस्मरणात गेले लाला लजपतराय !
विसरल्या गेल्या प्लेगच्या आठवणी, चाफेकर बंधुनी नेमके केले तरी काय ??
काहीही केले असेल पण आम्हास प्यारा फक्त १९२० नंतरचा हिंदुस्थान ...... ।। ३ ।।
.
शमल्या धगा तात्यारावांच्या विदेशी होळीच्या , डोक्यात फक्त १९४२ उरले !
स्वातंत्र्याचे मूळ कारण असलेले दुसरे महायुद्ध मात्र "कवटी"च्या जादूमुळे विसरले !!
१ पासून १००० पर्यंत सर्व नोटांवर तेच दिसतात कारण फक्त १९२० नंतरचा हिंदुस्थान ...।। ४ ।।
.
कुणा ना समजला बुद्ध ना भावले बाबासाहेब, दिसला येशु फक्त क्रुसावर !
ना उरी व्यापले अमृत"वासी" गुरुनानक, ना कोण वागले सम पैगंबर !!
कुणीही आला अन गळा चिरला तरी सर्वा भावे फक्त १९२० नंतरचा हिंदुस्थान ...।। ५ ।।
.
ना समुद्री चाच्याने सोशिले घावं, ना सरदारांचे कुणा कळले भाव !
सच्चा स्वातंत्र्य सैनिकाने केवळ स्वातंत्र्य पाहिले, न विचारात घेतला "डाव" !!
१९२० नंतरचेच परिणाम आजन्म भोगावे लागले तरी १९२० नंतरच्यांमुळे खंडित असे "अखंड" हिंदुस्थान ।। ६ ।।
.
.
.
.
.
............................विक्रांत वसंत फडके