कुठलेही "रत्न" मिळवणार्या माणसाने अजूनही कुठे मंदिर, मस्जिद किवा चर्च उभारल्याची नोंद कुणीही इतिहासात केलेली नाही आणि समजा कुणी म्हणत असेल कि अमुक एका समाजातील माणसाने इतिहास लिहिताना तशी घटना घडूनही ( कुठेतरी मंदिर, मस्जिद किवा चर्च उभारल्याची घटना ) त्याची नोंद केली नसेल तर त्या "रत्न"धारी "भारत"वासी महामानवाच्या कृतीची साक्ष तर अस्तित्वात असलीच पाहिजे का नाही ? अगदी साक्ष म्हणून बांधलेला इमला ( चर्च, मंदिर किवा मस्जिद किवा प्रार्थना स्थळ ) अस्तित्वात नसला तरी त्या इमल्याचे अवशेष तरी असतील का नाही ? …
.
भारत सरकारचा कुठलाही पुरस्कार न मिळवलेले इतकेच काय पाच वर्षे वकिलीचे शिक्षण घेऊनही केवळ इंग्रजांशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी लागतेय म्हणून सनद नाकारणाऱ्या स्वा. सावरकरांनी समस्त स्पृश्य आणि अस्पृश्य हिंदू बांधवांसाठी रत्नागिरीत पतित पावन मंदिर उभारले …… कुठल्याही नोंदीची गरज नसलेला पुरावा !!! पुराव्याची गरजच नाही कारण "अखंड" मंदिर अजूनही रत्नागिरीत डौलाने उभे आहे…
.
.
शेवटी रत्न आणि जाड भिंगाच्या चष्म्याची रस्त्याच्या बाजूला दारुड्या प्रमाणे लोळत पडलेली "फुटकी" काच यात फरक आहेच ना? रत्न रस्त्याच्या बाजूला "जाणूनबुजून" कुणी पाडवले तरी ते लोड शेडींगच्या वेळी "प्रकाश" टाकतेच … आणि जाड भिंगाच्या चष्म्याची रस्त्याच्या बाजूला दारुड्या प्रमाणे लोळत पडलेली "टाकाऊ"फुटकी काच कुणाच्या पायात गेली तर केवळ "रक्त" सांडते, कुठल्या गाडीच्या टायरमध्ये घुसली तर टायर पंक्चर करते …
.
निर्णय तुमच्या हाती आहे …. जाड भिंगाची फुटकी काच टक लावून बघायची का खर्या खुर्या रत्नाचे तेजात हरवून जायचे ?

No comments:
Post a Comment