Thursday, 4 April 2013

फक्त १९२० नंतरचा हिंदुस्थान .........

कुणा ना समजले शंभू राजे, कलेजी लागला फक्त दुर्दैवी अंत !
कुणा ना उमगले भाऊ , जयाने फोडीले दिल्लीचे मखमली तख्त !!
परी यत्र तत्र सर्वत्र फक्त आणि फक्त १९२० नंतरचा हिंदुस्थान ...... ।। १ ।।
.
झाशीच्या लक्ष्मीने त्यागला प्राण, टोप्यांनी मान त्यागिली !
१८५७ सालचा प्रलय , ज्याच्यामुळे इंग्रजी जान थरथरली !!
पण तरीही यत्र तत्र सर्वत्र फक्त आणि फक्त १९२० नंतरचा हिंदुस्थान ...... ।। २ ।।
.
विरले ते भगवतसिंग , विस्मरणात गेले लाला लजपतराय !
विसरल्या गेल्या प्लेगच्या आठवणी, चाफेकर बंधुनी नेमके केले तरी काय ??
काहीही केले असेल पण आम्हास प्यारा फक्त १९२० नंतरचा हिंदुस्थान ...... ।। ३ ।।
.
शमल्या धगा तात्यारावांच्या विदेशी होळीच्या , डोक्यात फक्त १९४२ उरले !
स्वातंत्र्याचे मूळ कारण असलेले दुसरे महायुद्ध मात्र "कवटी"च्या जादूमुळे विसरले !!
१ पासून १००० पर्यंत सर्व नोटांवर तेच दिसतात कारण फक्त १९२० नंतरचा हिंदुस्थान ...।। ४ ।।
.
कुणा ना समजला बुद्ध ना भावले बाबासाहेब, दिसला येशु फक्त क्रुसावर !
ना उरी व्यापले अमृत"वासी" गुरुनानक, ना कोण वागले सम पैगंबर !!
कुणीही आला अन गळा चिरला तरी सर्वा भावे फक्त १९२० नंतरचा हिंदुस्थान ...।। ५ ।।
.
ना समुद्री चाच्याने सोशिले घावं, ना सरदारांचे कुणा कळले भाव !
सच्चा स्वातंत्र्य सैनिकाने केवळ स्वातंत्र्य पाहिले, न विचारात घेतला "डाव" !!
१९२० नंतरचेच परिणाम आजन्म भोगावे लागले तरी १९२० नंतरच्यांमुळे खंडित असे "अखंड" हिंदुस्थान ।। ६ ।।
.
.
.
.
.
............................विक्रांत वसंत फडके

1 comment: