Friday, 25 January 2013

नागरिक शास्त्र



नागरिक शास्त्र नावाच्या विषयातील काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे ...
.
१)भारतीय घटनेच्या कोणत्या कलमात पंतप्रधान व मंत्रीमंडळाविषयी तरतूद आढळते ?
.
भारतीय घटनेत सर्व काही "तरतुदी" पंतप्रधान व मंत्रीमंडळासाठीच असतात .... 
जनतेसाठी काही असले तरी त्या वेळी हे पंत प्रधान आणि मंत्री प्रथम जनता होऊन सगळे बळकावतात ...

२)भारतात न्यायदान पद्धती कशा स्वरुपाची आढळते ?

.
सामान्य माणसाने आणि एखाद्या सरकार दरबारी वजन असलेल्या माणसाने समजा एकाच गुन्हा एकाच परीस्थितीत केला तर 
सामान्य माणसाला शिक्षा आणि त्या वजनदाराला जामीन ....
अशा काहीश्या स्वरुपाची न्यायदान पद्धती भारतात अस्तित्वात आहे ...

३)राज्यसभा हे कोणत्या प्रकारचे सभागृह आहे?
.
जे राजकारणी ( काही तुरळक अपवाद वगळता ) त्यांनी भूतकाळात सेवन केलेल्या जास्त मेव्यामुळे जनतेतून थेट निवडून येऊ शकले नाहीत त्यांच्या पोटापाण्याची सोय म्हणजे राज्यसभा होय ....

४)आघाडी सरकारची (संमिश्र सरकारची ) पद्धती केव्हा स्वीकारली गेली ?

.
जेव्हा राजकारण्यांच्या लक्षात आले कि एकाच पक्षाचे सरकार काही येऊ शकत नाही त्या वेळी काही पक्षांनी मिळून खुर्ची बळकवायची आणि पाच वर्षे जनतेला लुटायची पद्धती म्हणजे आघाडी सरकार होय ...
ही पद्धती स्वीकारली तेव्हाच गेली जेव्हा जनतेने एकाच पक्षाला सत्ता दिली नाही ...

५)सध्या भारतात किती राज्ये व किती केंद्रेशासित प्रदेश आहेत?

.
राज्ये २८ आणि केंद्रशासित प्रदेश ७ पण .....
.
सध्या भारतात कितीही राज्ये असली तरी त्यातील "एकसंध" पणावर नजर टाकली तर येत्या दोन तीन दशकात राज्यांची संख्या "अर्धशतक" लावू शकेल ..
जितकी राज्ये जास्त तितकी असंतुष्ट मंत्र्यांचे "संतुष्टीकरण" आणि टाकाऊ झालेल्यांचे "राज्यपाल"पद सुनिश्चितिकरण ....

६)भारतीय संविधान बनवण्यास किती कालावधी लागला होता ?

.
ऑप्शन ला टाकलेला प्रश्न ...

७)भारतीय लोकसभेचा कार्यकाल किती असतो? 

.
तसे बघायला गेले तर ५ वर्षे आहे पण सध्याच्या काळात "टेकू" काढला कि कार्यकाळ संपतो ..

No comments:

Post a Comment