Thursday, 22 May 2014

ब्रेड आणि बटर....................













राहुल किटलीवाला , छोटा पतौडी आणि डिग्गी शिंग या नावाचे तीन वयस्कर मित्र असतात .......
.
तिघेही उतार वयातच लग्न ( कितवे हा इश्यू इथे महत्वाचा नाही ) करतात ...
तिघेही कर्मधर्मसंयोगाने एकाच हॉटेलात हनिमून साठी जातात ....
तिघे सरत्या दिवशी काय काय केले हे एकमेकांना सांगायचे असे ठरवतात .....
नाही सांगितले तर दोस्ती तुटेल वैगेरे वैगेरे शपथा खातात ...
.
रात्र सरते ....
.
सकाळ उजाडते ....
.
 तिघेही त्यांच्या नववधुंसह ब्रेकफास्ट साठी टेबलावर येतात ...
.
शपथ तर पुरी करायचीच आहे पण एकमेकांच्या बायकांसमोर शब्दाने सांगणे म्हणजे शरमेचे असे तिघांनाही वाटते ...
.
तितक्यात वेटर ब्रेड आणि बटर घेऊन येतो ...
राहुलला आयडीया सुचते !!!
तो ब्रेड हातात घेऊन एका बाजूला 'एक' चमचा बटर लावतो आणि ब्रेडडिश मध्ये ठेवतो ...
.


छोटा पतौडीला हा इशारा समजतो ...तो  ब्रेड हातात घेऊन एका बाजूला 'दोन' चमचे बटर लावतो ...
.
डिग्गी शिंगला पण इशारा समजल्याचा इशारा करून तो ब्रेड हातात घेतो ...
ब्रेडच्या एका बाजूला एकदा आणि दुसर्या बाजूला दोनदा बटर लावून ब्रेड खाउन टाकतो ....
.
राहुल आणि छोटा पतौडी बेशुद्ध पडलेले असतानाच झुठमत वाहिनीतर्फे एक दाढीवाले वटवाघूळ ह्या सर्व घडामोडींचे लाइव्ह प्रक्षेपण करत असलेला पाहून डिग्गी शिंगपण बेशुद्ध पडतो ....
.
इकडे काहीच न समजलेला झुठमतवाला वटवाघूळ लाइव्ह प्रक्षेपणात बोंबा मारत असतो " डिग्गी शिंग यांची मानसिकता दिसून येते, दुसर्यापेक्षा आपण किती महान आहोत हे सांगण्याची वृत्ती या कृतीतून दिसून येते, तिघांनाही पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.."
.
.
( वरील घटनांचा कुणीही  वाईट अर्थ शोधून काढल्यास किंवा कुणालाही काही अर्थ न लागल्यास लेखक म्हणून मी जबाबदार नाही ... पात्रांची नावे काल्पनिक आहेत .. जीवित अथवा मृत लोकांशी संबंध आढळल्यास तो एक योगायोग समजावा ...)

Sunday, 27 April 2014

सत्यमेव जयते ! सत्यम एव जयते !! सत्य म ऐवज यते !!! ....................

हरवलो मी सत्यात आणि असत्यातील द्वंद्वात ....
सत्य ते होते जे मला माहिती नव्हते ...
असत्य काय होते ते माझ्या नयनांसमोर दरवळत होते ....
मी हतबल होतो पण निराशावादी नव्हतो ....
आशावाद नजरेसमोरून तरळत होता ....
नजरबंदीची 'साठी' नष्ट होऊ पाहत होती ....
पण म्हणून मी ज्या सत्य असत्याच्या नाण्यात गुरफटत चाललो होतो ....
त्यातून बाहेर आलोच तर आणखी काही धुसर सत्ये समोर आ वासून बसणार होती .....
.
शेवटी सत्याशिवाय असत्याचा सामना करणे कुणालाही शक्य नव्हते .....
आणि असत्याशिवाय सत्याचे पिवळेपण उजळणार नव्हते ....
.
सत्यमेव जयते ! सत्यम एव जयते !! सत्य म ऐवज यते !!!
या वाक्यातील विखुरलेल्या अस्थी गोळा करणे म्हणजे दिव्य काम होते ...
तरीही सर्व भारतीयांच्या तोंडात मात्र सत्यमेव जयते स्फुटत होते ......
शेवटी सत्य नसले तरी आपले ब्रीदवाक्य आहे "सत्यमेव जयते ".....
.
.
.
.
........................ विक्रांत वसंत फडके 

Wednesday, 5 June 2013

विठ्ठला अजब तुझे सरकार ......................

आताच हाती आलेल्या बातमीनुसार काँग्रेसचे काही नेते त्या माजी खासदाराला (कि खाज दाराला ???) भेटले
आणि त्यांनी सोन्याचे ( इटलीच्या आयात केलेल्या स्पेशल काँग्रेसी सोने ) बदलते गणित खालील भाषेत सांगितले....
                                   हा रुसवा सोड सख्या !!!!! पुरे हा बहाणा.............
                                                             सोड ना युतीला

तर हा कसा म्हणतो.......   लोकसभेत नको राज्यसभेत जाऊ ..........
                                    दिल्लीतच उभे राहू.....
                                     का?
                                     लोकसभेत पाडत्यात? " (इथे नको तिथे जाऊ आडोशाला उभे राहू च्या चालीवर )

काँग्रेसी नेते उवाच ........       "चल चल चल मेरे साथी काठी मार माथी
                                         अरे तू आयेगा तो आयेगा माया का हाथी......

  तर हा उवाच....................  तुम तो ठहरे परदेशी .............
                                           साथ क्या निभाओगे...............

काँग्रेसी नेते उवाच ........  आपटले आपटले जाना नाही हमे छोडके
                                     सोना को ठुकराके काँग्रेस को छोड के

  तर हा उवाच .........     नाही कसे म्हणू सोनीला पण म्हणतो रे !!


काँग्रेसी नेते उवाच ........ आपटल्या ये ना जगू कसे आम्ही तुझ्या विना
                                   आपटल्या ये ना

तर हा उवाच .........    सुनो सोनिमोरे लोगोंका वोट न खाय्यो.......
                                ( सून मैय्या मोरे मै नही माखन खायो च्या चालीवर )

 काँग्रेसी नेते उवाच ....   दास्या रे घायाळ हि सोनिनी

तर हा उवाच .............  नही ये हो नही सकता कि मै फिर पलटी मारू
                                 मन तो इधर भी नही लगता पर अब क्या करू?

 काँग्रेसी नेते उवाच ..... दास्या तू अब तो आजा सेना, युती छोडके आजा

तर हा उवाच .........   नारायणा रमा रमणा
                               केव्हा येऊ मी सोनी सदना?



असा आहे हा अदलाबदली फेम माजी खासदार ........................
बघा आता याला पाठींबा देणाऱ्यांनो याला परत परत पाडायचे कि थेट गाडायचे ते ?
सर्व काही तुमच्याच हातात आहे.....................................................
.
.
( विठ्ठला अजब तुझे सरकार हे नाव देण्याचे कारण पंढरपूर हे माउलीचे स्थान आहे वाचकांनी समजून घ्यावे)
.
.
............................विक्रांत वसंत फडके

Wednesday, 29 May 2013

प्रेम आणि बेवफाई

तू काय केलेस याची खातरजमा न करता मी तुला स्विकारले !
खोटे प्रेम करून खरी बेवफाई केलीस याचा कैफ नसे मला || १ ||
.
तू काय असशी यापेक्षा मी तुला आवडतो म्हणुनी मी न धिक्कारले !
खरे प्रेम करून खोटी बेवफाई केलीस याचा कैफ नसे मला || २ ||
.
तू वाईट आहेस यापेक्षा तू काही पुण्य केल्याचे मम हृदयी भावले !
खोटे प्रेम करून खोटी बेवफाई केलीस याचा कैफ नसे मला || ३ ||
.
तू खरा आहेस यापेक्षा सत्य तुझ्या हृदयातले मज दिसले !
खरे प्रेम करून खरी बेवफाई केलीस याचा कैफ आहे मला || ४ ||
.
.
जाऊ दे ! विसरून जा !! माझ्या छातीतून झिरपणारे प्रेम न तुला दिसले !
कसेतरी प्रेम करून बेवफाई केलीस याचा कैफ असे मला || ५ ||
.
.
.
.
.
.......................................... विक्रांत वसंत फडके

Monday, 27 May 2013

केवळ तिच्यामुळे ! केवळ तिच्यामुळे !!

मी तिच्याशी प्रेमाचे नाटक केले होते पण केवळ द्वेषाने ...
पण नंतर तिच्या प्रेमात मी पडलो होतो .....
नंतर द्वेषाची जागा प्रेमाने घेतली अन
माझ्यातील द्वेषांकुर उठला ...
तरी मी प्रेम केले होते द्वेषाने !!! केवळ द्वेषाने !!!
.
मी म्हणालो ! चल येतेस का? केवळ द्वेषाने ...
पण नंतर तिच्या प्रेमात मी पडलो होतो ......
नंतर द्वेषाची जागा हक्काने घेतली अन
माझ्यातील मनुष्यांकुर उठला ...
तरी मी प्रेम केले होते मनुष्यत्वाने !! केवळ मनुष्यत्वाने !!!
.
मी म्हणालो ! मी निघालो ! तू पण बाहेर पड...
पण नंतर ती घाबरली ! तरी मी स्थितप्रज्ञ होतो ...
नंतर ती स्थिर राहिली आणि हक्क गेला चुलीत अन
माझ्यातील असुरांकुर जागा झाला ..
तरीही मी प्रेम केले होते असुरत्वाने ! केवळ असुरत्वाने !!!
.
मी स्थित राहिलो ! मी भरकटलो !! मी गुरफटलो !!!
पण नंतर ती अडकली ! तरी मी पुरुष होतो ...
नंतर ती माता बनली आणि मी काखा मिरवल्या अन
माझ्यातील पुरुष जागा झाला ..
मी जागा झालो पुरुषत्वाने ! केवळ पुरुषत्वाने !!!
.
कोर्ट कचेर्या तिने केल्या ! मी अहम जपीत राहिलो ! जपाने !!!
पण नंतर माळ गुरफटली ! तरी मी माळमणी नव्हतो .....
नंतर मधला मणी निखळला आणि माळा विझल्या अन
माझ्यातील अहंकार जागृत झाला
मी हरलो केवळ अहंकाराने ! केवळ अहंकाराने !!!
.
.
.
ती तिथेच होती पण मी तिला कचरा समजलो अन कचरा कुणी दुसर्यानेच उचलला !
मी अजूनही अहमात ! मी अजुनही अहंकारात ! मी अजूनही पुरुषत्वात !
परी अहम माझ्यापासूनी न दूर होत पाहे केवळ तिच्यामुळे ! केवळ तिच्यामुळे !!
.
.
.
.
................................................ विक्रांत वसंत फडके

Friday, 17 May 2013

टोळ पहा कसे गवतावरती आनंदे टुणटुण उडती .....................


आम्ही नाही खाल्ले काही असे नेते म्हणती
टोळ पहा कसे गवतावरती आनंदे टुणटुण उडती || १ ||
.
समाजकारण करून करून झिजलो म्हणती
टोळ पहा कसे गवतावरती आनंदे टुणटुण उडती || २ ||
.
राजकारणात राम नाही म्हणून इलेक्शनला उभे राहती
टोळ पहा कसे गवतावरती आनंदे टुणटुण उडती || ३ ||
.
घोटाळे करून वर तोंड करून न केल्याचे सांगती
टोळ पहा कसे गवतावरती आनंदे टुणटुण उडती || ४ ||
.
वर तोंड करून फिदीफिदी हसती सभेत मात्र भांडती
टोळ पहा कसे गवतावरती आनंदे टुणटुण उडती || ५ ||
.
कुणी ना कमी कुणी ना जास्त सर्वांचीच गुप्त युती
टोळ पहा कसे गवतावरती आनंदे टुणटुण उडती || ६ ||
.
म्हणती द्या पद नाहीतर वाढवेन दुसर्याची संख्या शक्ती
टोळ पहा कसे गवतावरती आनंदे टुणटुण उडती || ७ ||
.
पाणी नाही म्हणणार्या जनतेच्या तोंडात मुतती
टोळ पहा कसे गवतावरती आनंदे टुणटुण उडती || ८ ||
.
बाके वाजवती, शिव्या देती, काही झोपाही काढती
टोळ पहा कसे गवतावरती आनंदे टुणटुण उडती || ९ ||
.
जनता मेली किवा जगली हे नाही त्यांच्या खिजगणती
टोळ पहा कसे गवतावरती आनंदे टुणटुण उडती || १० ||
.
नेते टुणटुण उडती कसे पहा संसदेतील बाकावरती
टोळ मात्र गवताच्या पात्याच्या धारेने हैराण होती || ११ ||


.
.
.
.
.
.........................विक्रांत वसंत फडके

Monday, 6 May 2013

अखंड भारताचे "कांडण "वन .....


मन्या विचारे सोनियाला
देऊ या चीनला भूमी आंदण....
हिंदू भांडे मुस्लिमांसंगे
करीन म्हणतात एकमेकांचे कांडण // १ //
.
शरद म्हणे अजितला
तुझ्या चड्डीला मुताचे गोंदण
मुस्लिम भांडे बहुजनासंगे
करीन म्हणतात एकमेकांचे कांडण // २ //
.
लालू म्हणे राबडीला
करू मिळूनी चाऱ्याचे खंडन
बहुजन भांडे ख्रिश्चना संगे
करीन म्हणतात एकमेकांचे कांडण // ३ //
.
पेट्रोल,डीझेल म्हणती जनतेला
नका करू रुदन
ख्रिश्चन भांडे शीखा संगे
करीन म्हणतात एकमेकांचे कांडण // ४ //
.
टू जी, कोळसा आणि आदर्श
करती हात दाखवून अवलक्षण
शीख भांडे इसाया संगे ,
करीन म्हणतात एकमेकांचे कांडण // 5 //
.
सोनिया सांगे मंत्र्यांना
करू नका आपसात भांडण
सर्वांनी मिळून करू
अखंड भारताचे "कांडण "वन ..... // ६ //
.
.
.
................................... विक्रांत वसंत फडके