Friday, 12 April 2013

अहम मुक्त होतो परी तवं अडकतो ….

तरीही दरवर्षी १४ एप्रिलला अहम मुक्त होतो परी तवं अडकतो ….
नाकात जणू एक असा उग्र वास घोंगावतो कि जिणे नकोसे होते …
श्वास कोंडतो !! त्वेषाने डोळ्यांना पण जाड भिंगाचा चष्मा लागतो ?!?..॥ १ ॥
.
तरीही दरवर्षी १४ एप्रिलला अहम मुक्त होतो परी तवं अडकतो ….
कधी न वावगे कुणी तयांशी वागले परी तयांची कृती का दुखवते ……
ठसका लागतो !! ठसक्याने घशाला सम कर्क रोध दुखावतो ??!!??...॥ २ ॥
.
तरीही दरवर्षी १४ एप्रिलला अहम मुक्त होतो परी तवं अडकतो ….
केला देऊ तवांने तरी तव नियती का तुजसवे लपाछपी खेळते ?……
हस्तरेषा फिरते !! रेषेने कुणा वाचणार्याच्या जीव का वाचू लागतो ??!!?? ।। ३ ॥
.
तरीही दरवर्षी १४ एप्रिलला अहम मुक्त होतो परी तवं अडकतो ….
करविली "तवांतरे"! लादिली आरक्षित "बंदरे"!! नियती अर्थाशी खेळते ....
"घटना" फिरवली गेली अन प्रयोग करूनही खरां सत्यात भरकटतो … ॥ ४ ॥
.
तरीही दरवर्षी १४ एप्रिलला अहम मुक्त होतो परी तवं अडकतो ….
तळ्याची चाखिली जयाने माती, चिखलात कमळ कमाल करून जाते ....
अन कसपटी बेडूक डराव डराव करुनची कुर्मास "फुका" दरडावतो .....॥ ५ ॥
.
.
.
( थोडक्यात अर्थ :- वाचले म्हणून येणारा अहम मुक्त होतो पण अनुभवातून येणारा तवं वाचनात अडकतो ….नुसतेच वाचून काही अर्थ नाही वाचनातून काही "बोध" घेतला तरच त्या वाचनाला किंमत असेल )
.
.
.
..................... विक्रांत वसंत फडके

No comments:

Post a Comment