Friday, 2 November 2012

पॉवर बाज साहेब आणि एकच प्याला फेम तळीराम...............

पॉवर बाज साहेब आणि एकच प्याला फेम तळीराम यांचा संवाद झालाच तर तो कसा होईल यावर एक दृष्टीक्षेप


.

.

.

तळीराम :- साह्येब तुम्ही कशाकशाची पाडायचा विचार करत आहात ?

पॉवर बाज साहेब :- तुम्ही म्हणाल त्याची.. जनतेच्या प्रत्येक मागणीचा आम्ही विचार करू.

तळीराम:- नाय पण साहेब. तुम्ही मंत्री आहात ना? मग कशाची पाडायची हे तुम्हीच ठरीवणार नाही का?

पॉवर बाज साहेब :- आम्ही जगातल्या प्रत्येक पडण्याजोग्या वस्तूची पाडू शकतो . तशी " पॉवर " आहे आमच्याकडे

तळीराम :- "बारा " वेळा " मती " गुंग झाली पण कशाकशाची ते नाही मिळत हो साहेब

पॉवर बाज साहेब :- महाराष्ट्रातील अठरा पगड झाडांच्या , फुलांच्या जातींची पण पाडू आहे काय त्यात.

तळीराम:- समस्त "कोंड"लेल्या "देवां " चे आशीर्वाद लाभतील तुम्हाला.

पॉवर बाज साहेब :- कोंड देवांचे लाभले तरी पुष्कळ

तळीराम:- ते लाभले ना ? एकदा "वासला"त लावलीत कि मार्गातील " खडक" रुपी विरोधकांची. परत इच्छा आहे का?

पॉवर बाज साहेब :- हां हां . " अ !! ..जीत " मिळवण्याची " पॉवर " असताना गव्हाची करीत बसल्याचा परिणाम आहे तो.

तळीराम:- साहेब गव्हाची तर गव्हाची. ती तर पाडा कि हो.

पॉवर बाज साहेब :- राजकारण आणि भट्टी दोन्हीही ठिकाणी काडी योग्य वेळीच टाकावी लागते. नाहीतर घड्याळ १० वाजून १० मिनिटांनी बंद होते.

तळीराम:- साहेब आता घड्याळात बघून काय पाडताय ? द्राक्ष आणि मळीची पिऊन जीव वैतागलाय. होऊन जाऊ द्या गव्हाची.

पॉवर बाज साहेब :- तुमच्या अनुमोदनासह प्रस्ताव ठेवतो म्याडम जवळ. बघुया तो "सोनियाचा " दिन उगवतो का.

तळीराम:- ठीक आहे साहेब माझी वेळ झाली वरती मित्रमंडळी ग्लास टेबलावर लाऊन बसलेत. पण गव्हाची पहिली धार मलाच.

पॉवर बाज साहेब :- तळीराम जी, प्रस्ताव पास तर होऊ द्या. मग तुमचे तोंडच धारेला लावू.

.

.
तळीराम पहिल्या धारेची मिळणार म्हणून खुश आणि साहेब एक तरी पक्षेतर ( तळीरामाच्या वेळेला घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे पक्ष नव्हते ) माणसाचा पाठींबा आहे म्हणून खुश .... एकूणच काय "शरदा " च्या भट्टीत सॉरी हा चांदण्यात दोघेही गुर्हाळात


.

.

( वाचकांनी हे वाचल्यावर खालील गोष्टी पण वाचाव्यात )

१) मराठी भाषा वळवावी तशी वळते... त्यामुळे तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ आणि लेखक म्हणून मला अभिप्रेत असलेला अर्थ यात मोठी तफावत असू शकते ..

२) बाजारात मिळणार्या प्रत्येक घड्याळात १० वाजून दहा मिनिटे ठेवणे हि फार पूर्वीची प्रथा आहे. कुणी नव्याने पाडलेली प्रथा नाही. अगदी पाश्चात्य देशांपासून जगात सर्वत्र हीच प्रथा आहे.

३)पॉवर बाज साहेब आणि तळीराम ( आभार राम गणेश गडकरी साहेब ) हि फक्त दोन काल्पनिक पात्रे आहेत. कुणाही जिवंत अथवा मृत व्यक्तींशी त्याचा काहीही संबंध नाही. असल्यास निव्वळ योगायोग समजावा

४) लेखातील घटना याही काल्पनिक असून सत्य घटनेवर आधारित नसून घटनेशी साधर्म्य आढळलेच तर तोही एक योगायोग समजावा.

No comments:

Post a Comment