विशेष – ‘रॉबर्ट वड्रा’ नावाचा चमत्कार !! ( साप्ताहिक विवेक - ०४ नोव्हेंबर २०१२.)
माधव भांडारी
1997 साली पितळी व लाकडी वस्तू विकणारा रॉबर्ट वड्रा नावाचा एक सामान्य व्यापारी आज अब्जावधीच्या संपत्तीचा मालक आहे. एकटया डीएलएफबरोबर त्याने केलेला व्यवहार 300 कोटींचा आहे. त्याखेरीज अनेक व्यवहार त्याच्या नावावर जमा आहेत. सेलिब्रिटी नेटवर्थ नामक एका वेबसाईटने तर असा दावा केला आहे की रॉबर्ट वड्रा आज 11000 कोटींचा मालक आहे. या दाव्यात काही अतिशयोक्ती आहे असे मानले, तरी एका गोष्टीबाबत आज कोणाचेच दुमत नाही; ती म्हणजे रॉबर्ट वड्रा आज देशातील मोजक्या धनाढय लोकांपैकी एक आहे. या चमत्काराच्या मागील रहस्य काय?
काँग्रेसच्या आणि सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (संपुआच्या) अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा गेल्या काही दिवसांमध्ये एकाएकी राजकीय चचर्ेच्या केंद्रस्थानी आले आहेत. गेल्या पंधरवडयात स्वयंघोषित ‘जन लोकपाल’ अरविंद केजरीवाल यांनी रॉबर्ट वड्रांच्या जमिनींच्या व्यवहारांबद्दल आरोप केले. त्यामुळे वड्रांना एकदम प्रसिध्दी मिळाली आणि त्यांच्या विविध ‘उद्योगां’बद्दल चर्चाही सुरू झाली. खरे तर सोनिया गांधींचे हे जावई पहिल्यापासून वादग्रस्तच आहेत. आज 43 वर्षाचे असलेल्या रॉबर्ट वड्रांनी 1997 साली प्रियांका गांधींशी लग्न केले. त्या दिवसापासूनच ‘आहेत कोण हे रॉबर्ट वड्रा?’ हा प्रश्न आजतागायत विचारला जात आहे आणि आजवर त्यांच्या बाबतीतल्या उत्सुकतेचेर् पूणपणे निरसन झालेले नाही. कारण भारतातल्या ‘तथाकथित राजघराण्याचे जावई’ एवढीच त्यांची ओळख आजही आहे. भारताच्या माजी पंतप्रधानांच्या लेकीशी लग्न करणे, या पलीकडे कोणतेही कर्तृत्व त्यांनी आजपर्यंत दाखवलेले नाही. प्रियांका गांधींनी या वड्राशी लग्न केले, तेव्हा उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथील कोणी एक राजेंद्र वड्रा यांचे चिरंजीव, एवढीच त्यांच्याबद्दलची माहिती जगाला मिळाली होती. हे राजेंद्र वड्रा मूळचे सध्याच्या पाकिस्तानातील सियालकोटचे होते. पितळी व लाकडी कलाकुसरीच्या वस्तूंचा व्यापार हा त्यांचा पिढीजात व्यवसाय होता. फाळणीच्या वेळी ते भारतात आले. त्यांची पत्नी, रॉबर्टची आई – मॉरीन ही कडवी स्कॉटिश ख्रिश्चन होती. लग्नानंतर राजेंद्र यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता की नाही, याची निश्चित माहिती उपलब्ध नाही. पण त्यांच्या तिन्ही मुलांना मॉरीनने बाप्तिस्मा देऊन ख्रिश्चन बनवले होते. राजेंद्र वड्रा यांचा पिढीजात व्यवसाय असला तरी तो काही फार भरभराटीला आलेला नव्हता. एक सर्वसाधारण, मध्यम दर्जाचा व्यापारी, अशीच त्यांची समाजाला ओळख होती. रॉबर्ट हेसुध्दा काही महाविद्यालयीन जीवनात चमक दाखवलेले किंवा शिक्षण संपवून पिढीजात व्यवसायात उतरल्यानंतर त्यात विशेष नाव कमावलेले, काही खास कर्तृत्व दाखवलेले व्यक्तिमत्त्व नव्हते. त्यामुळे अशा प्रकारे गांधी घराण्याच्या जवळपाससुध्दा पोहोचू न शकणाऱ्या रॉबर्टशी प्रियांकाने विवाह का केला असावा, हा प्रश्न आजही विचारला जातो. लग्नानंतर रॉबर्ट वेगवेगळया कारणांनी – कधी त्यांच्या मोटारसायकल्सच्या शौकामुळे, तर कधी सलमान खान स्टाईल मारत चमकोग्ािरी करत फिरण्यामुळे – चचर्ेत येत राहिले. पण त्यांचा हा वावरही सीमारेषेवर घुटमळणारा वावरच होता. सोनिया गांधींनी रॉबर्टला आपल्या कुटुंबाच्या वर्तुळात खऱ्या अर्थाने कधीच स्वीकारले नाही. पण आपण गांधी खानदानाचे जावई आहोत हे दाखवण्याची आणि त्यातून मिळणारे लहानमोठे फायदे पदरात पाडून घेण्याची एकही संधी रॉबर्टने कधी वाया जाऊ दिली नाही. त्यांच्या या वागण्याचा गांधी खानदानाला सतत उपद्रवच होत राहिला.
2004 साली सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली मनमोहन सिंग यांचे संपुआ सरकार केंद्रात सत्तेवर आल्यावर तर रॉबर्ट वड्रा अक्षरश: एका रात्रीत ‘अति अति महत्त्वाची व्यक्ती’ बनले. लाचारी आणि लांगूलचालन यातच वाकबगार असलेल्या काँग्रेसजनांनी व आपल्या सनदी नोकरशाहीने गांधी घराण्याच्या या जावयाला राष्ट्राचे जावई बनवले. त्यांना सर्वोच्च दर्जाची सुरक्षा बहाल केली गेली. एवढेच नाही, तर देशातल्या सर्व विमानतळांवर त्यांना सुरक्षा तपासणीतूनसुध्दा सूट दिली गेली. त्या आशयाचे फलक सर्व विमानतळांवर ठळकपणे झळकायला लागले. देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायमूर्ती, सर्व सेना दलांचे प्रमुख, पंतप्रधान व लोकसभेचे सभापती अशासारख्यांच्या, खऱ्या अर्थाने मान्यवर असणाऱ्या बावीस जणांच्या रांगेत रॉबर्ट वड्रा तेविसावे म्हणून मिरवायला लागले. पात्रता काय? तर प्रियांका गांधींचे पती – सोनिया गांधींचे जावई! अशी वेगळी आणि खास वागणूक मिळायला लागल्यानंतर रॉबर्ट वड्रांचे वारू चौखूर उधळले नसते तरच नवल !!
रॉबर्ट वड्रा हे सत्तेबाहेरचे घटनाबाह्य सत्ताकेंद्र बनले असून आपल्या नातेसंबंधांचा पुरेपूर गैरफायदा उठवायला लागले आहेत, या बातम्या 2007 सालापासूनच यायला लागल्या होत्या. पण त्यांचे गांभीर्य देशासमोर यायला आणखी चार वषर्े जावी लागली. गेल्या वर्षी – मार्च 2011मध्ये इकॉनॉमिक टाईम्सने रॉबर्ट वड्रांच्या जमिनींच्या व्यवहाराबद्दलच्या बातम्या सर्वात पहिल्यांदा प्रसिध्द केल्या. केजरीवाल यांनी डीएलएफबरोबरच्या ज्या व्यवहारांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तो व्यवहार इकॉनॉमिक टाईम्सने गेल्या वर्षीच बाहेर आणला होता. त्यावर संसदेत चर्चाही झाली होती. पण नंतर एकामागून एक मोठे घोटाळे बाहेर येऊ लागले आणि तो विषय मागे पडला. इकॉनॉमिक टाईम्सने गेल्या मार्चमध्ये दिली होती त्यापेक्षा वेगळी व नवीन अशी कोणतीच माहिती केजरीवालनी बाहेर काढली नाही. पण ज्या वृत्तपत्रांनी व प्रसारमाध्यमांनी गेल्या वर्षी या बातमीकडे लक्ष दिले नव्हते – किंबहुना दुर्लक्षच केले होते, त्या सर्वांनी काही अनाकलनीय कारणांमुळे केजरीवाल यांचे आरोप मात्र उचलून धरले व एकच गदारोळ केला. त्या गदारोळामुळे एकच साध्य झाले की, रॉबर्ट वड्रांचे उद्योग सर्वांच्या लक्षात आले.
असे सांग्ाितले जाते की 1997 साली पितळी व लाकडी वस्तू विकणारा रॉबर्ट वड्रा नावाचा एक सामान्य व्यापारी आज अब्जावधीच्या संपत्तीचा मालक आहे. एकटया डीएलएफबरोबर त्याने केलेला व्यवहार 300 कोटींचा आहे. त्याखेरीज अनेक व्यवहार त्याच्या नावावर जमा आहेत. सेलिब्रिटी नेटवर्थ नामक एका वेबसाईटने तर असा दावा केला आहे की रॉबर्ट वड्रा आज 11000 कोटींचा मालक आहे. या दाव्यात काही अतिशयोक्ती आहे असे मानले, तरी एका गोष्टीबाबत आज कोणाचेच दुमत नाही; ती म्हणजे रॉबर्ट वड्रा आज देशातील मोजक्या धनाढय लोकांपैकी एक आहे. आज असलेल्या स्थानावर यायला टाटा उद्योगसमूहाला सर्ंपूण शतक लागले, अंबानींना आणि रिलायन्सला पन्नास वषर्े लागली; पण रॉबर्ट वड्रा मात्र अवघ्या सात वर्षांमध्ये टाटा-अंबानी यांच्या रांगेत येऊन बसला आहे. या चमत्काराच्या मागील रहस्य काय? हा प्रश्न काहीशा गमतीत आणि बराच गंभीरपणे विचारला जातो.
हा पैसा, ही संपत्ती त्याने कोठून आणली? कोणत्या र्मागाने मिळवली? हे खरे प्रश्न आहेत. कारण आजही रॉबर्ट वड्रा कोणताही अधिकृत व्यवसाय करीत नाहीत. त्यांच्या उत्पन्नाची साधने काय? या प्रश्नाचे उत्तर कोणी देत नाही. आपल्या पत्नीला – प्रियांका गांधींना बरोबर घेऊन 2007 साली त्यांनी एक कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी भाडयाने घेतलेली विमाने, हेलिकॉप्टर्स भाडयाने देणार होती. पण घोषित केलेला हा व्यवसाय त्या कंपनीने एक दिवसही केला नाही. उलट ही कंपनी जमिनींच्या खरेदी-विक्रीत श्ािरली. डीएलएफबरोबर केलेले जमिनींचे व्यवहार या कंपनीच्या नावे केले गेले आहेत. दरम्यान 2009मध्ये प्रियांका गांधी या कंपनीतून बाहेर पडल्या होत्या. गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये रॉबर्ट वड्रांनी अशा अनेक कंपन्या स्थापन केल्या व त्यांच्या नावावर अनेक उद्योग केल्याचे दाखवले. (या बहुतेक कंपन्यांमध्ये त्याची आई मॉरीन भागीदार आहे!) पण त्यातला कोणताच उद्योग प्रत्यक्षात पाहायला मिळत नाही. असे असले तरी त्यातून त्यांना भरमसाठ उत्पन्न मात्र मिळालेले दिसते. स्वत: स्थापन केलेल्या कंपन्यांखेरीजही रॉबर्ट वड्रांचा अनेक कंपन्यांशी संबंध आहे. अशा कंपन्यांपैकी एक महत्त्वाची कंपनी म्हणजे ‘युनिटेक’ ही होय! ह्या युनिटेकलाच 2जी स्पेक्ट्रम घोटाळयाचा सर्वात जास्त फायदा झाला होता आणि वड्राकडे या कंपनीचे 20 टक्के शेअर्स आहेत. राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळयाशी संबंधित असलेल्या काही कंपन्यादेखील वड्राच्या किंवा त्याच्याशी संबंधित आहेत, असे सांग्ाितले जाते.
एकूणच रॉबर्ट वड्रा हा एक चमत्कार आणि रहस्य दोन्ही आहेत. त्यांच्या लग्नानंतर त्यांची आई सोडून त्यांचे सर्व सख्खे नातेवाईक – वडील, धाकटा भाऊ व बहीण, रहस्यमयरीत्या मारले गेले आहेत. 2009 साली दिल्लीच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पंख्याला टांगलेल्या अवस्थेत त्याच्या वडिलांचा मृतदेह सापडला. पण वड्रा कुटुंबीयांचा दावा मात्र वेगळाच होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, राजेंद्र वड्रांचा मृत्यू किडनीच्या विकारामुळे झाला होता. त्यापूर्वी, 2003मध्ये रॉबर्टचा मोठा भाऊ रिचर्ड याचा मृतदेह राहत्या घरात संशयास्पद अवस्थेत सापडला होता, तर बहीण मिशेल ही त्याही अगोदर, 2001 साली रस्त्यावरच्या एका विचित्र अपघातात मारली गेली होती. यापैकी एकाही मृत्यूची चौकशी केली गेली नाही. 2007 साली रॉबर्टने आपल्या जन्मदात्या वडिलांना नाकारणारी एक जाहिरात प्रसिध्द केली होती. ‘राजेंद्र वड्रा नामक कोणी एक व्यक्ती माझ्या नावाचा व गांधी घराण्याबरोबरील माझ्या नात्याचा गैरवापर करीत आहे. त्या व्यक्तीशी माझा काहीही संबंध नाही’ ही त्या जाहिरातीची शब्दरचना होती.
एकूणच, रॉबर्ट वड्राचे कुटुंब आणि त्याचे ‘व्यवसाय’ या दोन्ही गोष्टी संशोधनाचे, तपासाचे विषय आहेत. सध्याचे मनमोहन सिंग सरकार यापैकी काहीच करणार नाही. कारण तो त्यांचा जावई आहे. रॉबर्ट वड्रा सोनिया गांधींचा, काँग्रेसचा आणि संपुआ सरकारचा जावई असला तरी तो भारतीय जनतेचा जावई बिलकूल नाही, हे जनतेने लक्षात ठेवले पाहिजे.

No comments:
Post a Comment