सगळी दुनिया आहे खोट्याची पण सगळे खरेच आहे
जाणून बुजून धोका खाणे किती मस्त वाटते आहे !
.
सगळे मंत्री आहेत भ्रष्ट पण सगळेच सगळ्या पक्षात आहे
जाणून बुजून कुणा चोराच्या हाती दोर देणे भागच आहे !!
.
जनता कितीही बोंबा मारो तरी सेट top बॉक्स बसवणे अनिवार्य आहे
सेट top वाल्यांचे कमिशन मंत्र्यांच्या खात्यात जाणे भाग आहे !!
.
सहा सिलेंडर वापरा अथवा नका वापरू तुमच्या कार्डावर ३१ मार्च ला ते दिसणार आहे
कारण Gas वाल्यांना पण सातव्या सिलेंडर मधूनच कमाई आहे !!!
.
विचार करा आणि मते द्या कारण २०१४ चे घोडा मैदान फारच जवळ आहे
कुणालाही मत दिलेत तरी भ्रष्टाचार काही थांबणार नाही आहे !!!!
.
.
.
.................. विक्रांत वसंत फडके

No comments:
Post a Comment